दहावी बोर्ड परीक्षा 2026 8 मेला ऑनलाइन जाहीर होणार |10th Board Exam 2026 will be declared online on 8th may
बारावीच्या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची चिंता लागली होती. दहावी बोर्ड परीक्षा 2026 चा निकाल 8 मेला म्हणजे आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे असे बोर्डाकडून एका परिपत्रकाद्वारे घोषित करण्यात आलेले आहे.
दहावी निकाल 2026 परिपत्रकातील माहिती
राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात असे म्हणण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2026मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक 8 मे 2026रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे
💥 दहावी मार्च 2026निकाल पाहण्यासाठी वेबसाईट
दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील वेबसाईटचा उपयोग करून आपला निकाल तात्काळ पाहावा.
दहावी निकाल 2026 पत्रकार परिषद
दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2026 एकत्रित निकाल कसा लागला या संदर्भात शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर शारदा सभागृहात पत्रकार परिषदेचा आयोजन करण्यात आलेले आहे या पत्रकार परिषदेला महाराष्ट्रातील सर्व प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन देखील या परिपत्रकामध्ये करण्यात आलेले आहे.
आज 8 मे रोजी एका आदेशात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत दहावीचा निकाल कधी लागणार आणि या संदर्भात पत्रकार परिषद कधी घेतली जाणारी या संदर्भात आवाहन करण्यात आलेले आहे


121523
उत्तर द्याहटवाMa
उत्तर द्याहटवाJatin patidar
उत्तर द्याहटवा